भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार स्व.रतन टाटा यांना आरमोरीकरांन तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण
जिल्हा प्रतिनिधी विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी:- भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार, टाटा समूहाचे सर्वेसर्वा , भारतरत्न स्व.रतनजी टाटा यांचे दुःखद निधन झाले मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आज दिनांक १०/१०/२०२४ ला सायंकाळी ६:०० वाजता स्थळ टी पॉईंट, आरमोरी येथे आयोजित केलेला होता याप्रसंगी उद्योग सम्राट स्व.रतन टाटा यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती पेटवून व मौन पाडून व त्यांच्या जीवनातील महान कार्याची माहिती नागरिकांना देऊन सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था ,आरमोरी चे अध्यक्ष देवानंद दुमाने ,युवारंग चे उपाध्यक्ष मनोज गेडाम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव अमोल मारकवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे निखिल धार्मिक ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रंजीत बनकर ,शिवसेना (उबाठा ) गटाचे तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा उपाध्यक्षा विभाताई बोभाटे, नगरपरिषद चे माजी बांधकाम सभापती सागर मने, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष अंकुश गाढवे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका कार्याध्यक्ष सुनील नंदनवार ,युवारंग चे कार्य सहसचिव लीलाधर मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस युवा तालुकाध्यक्ष दिवाकर गराडे , भारत करिअर अकॅडमी चे संचालक महेंद्र मने, आरमोरी चे प्रसिद्ध कवी स्वप्निल जुआरे युवारंग चे सदस्य शुभम वैरागडे, मनोज निमगडे,कुणाल आठवले, प्रतीक निमजे, अनुराग सरदार काशिनाथ पोटफोडे, देवयानी बोबाटे, नंदिनी ढवगाये, रुचिता नैताम,वेदिका बोरकर, संजना सरदार व शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .